डॉ. राजीव जोशी - लेख सूची

निवडणुका, धर्म आणि जात

निवडणुकांसाठी उघड-उघड धार्मिक आवाहन होणे हे नवे नाही. परंतु “बहुजन वंचित आघाडीच्या ३७ उमेदवारांच्या नावापुढे त्या व्यक्तींच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख” किंवा “भाजप-शिवसेनेने सातत्याने मराठा समाजाची फसवणूक केली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवाराला मतदान करण्यात येणार नाही, असे मराठा समाजाने म्हटले” जात व धर्म यांचा असा उघड-उघड वापर हे नवे वळण वाटते. पुरोगामी म्हणून मिरविल्या जाणार्‍या …

कलाकृती आणि समाज

  मी ललित किंवा तत्सम साहित्य क्वचितच वाचले आहे. श्री भालचंद्र नेमाडेंना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या लेखनाच्या साहित्यिक आणि सामाजिक मूल्यांची अधिक चर्चा होणार आहे. कला मूल्यांपेक्षा मी कलाकृतीच्या सामाजिक परिमाणाला अधिक (कदाचित अवास्तव) महत्त्व देतो. परंतु प्रत्यक्ष लिखाण न वाचता (आणि तसे परिश्रम न घेता) काही एक सर्वसाधारण स्वरुपाचे विचार व्यक्त करता येतात. नेमांडेंचा स्वतःचा दृष्टिकोन स्पष्ट आहे – “मी परंपरेचे जे …

सामाजिक विकृतिविज्ञान

[शिवसेनेचे नेते आनंद दिघे ठाण्याजवळ एका अपघातात जखमी झाले. इस्पितळात उपाय योजना होत असतानाच ते वारले. ह्यात वैद्यांचा हलगर्जीपणा आहे असे मत बनवून शिवसैनिकांनी ते अद्ययावत खाजगी इस्पितळ नष्ट केले. ह्या घटनेबद्दल डॉक्टर जोशी लिहितात . . .] वैद्यकक्षेत्रातील लोक व इतर विचारवंत यांनी शिवसैनिकांचा फक्त निषेध करणे पुरेसे नाही. सामाजिक विकृती व त्यांवरील उपाय …